Next

वर्दळीच्या ठिकाणी पोलिसाला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:48 IST2021-11-03T13:48:05+5:302021-11-03T13:48:51+5:30

गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत साध्या वेशात गस्त घालणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण.. पिंपरी चिंचवडच्या देहूरोड येथील घटना सीसीटीव्हीत कैद.. ज्ञानेश्वर गाडेकर असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव.. देहूरोड बाजारपेठेत साध्या वेशात गस्त घालत असताना अरविंद ढिल्लोड याने मारहाण केली. आरोपीने ज्ञानेश्वर गाडेकर यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भर वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी अरविंद ढिल्लोड याला अटक केली.