Next

नितेश राणे बाहेर, पण राणेंच्या पीएला आत टाकलं, काय घडलं? Narayan Rane | Rakesh Parab Nitesh Rane

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:51 IST2022-02-02T14:50:58+5:302022-02-02T14:51:23+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राणेंनी जिंकली खरी.. पण या निवडणुकीचा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही.. याचं कारण म्हणजे या निवडणुकीदरम्यान जे काही घडलं, त्यानंतर राणेंच्या मागे अडचणींचा जो सपाटा लागला तो अद्याप थांबलेला नाही... शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे हे आधी सत्र न्यायालयात गेले.. मग उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात पण कुठेच नितेश यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही.. नितेश राणे यांच्यावर अटकेची ही टांगती तलवार कायम असतानाच आता मोठी घडामोड घडलेय.. कारण नितेश राणे यांच्या पीएलाच थेट पोलिस कोठडी सुनावण्यात आलेय.. नेमकं काय घडलंय... राणेंचेही पीए कोण आहेत.. त्यांचा या सगळ्यात काय संबंध आहेत... जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा..