News & Views Live: राणेंना बंदी, ठाकरेंची एन्ट्री, कोकणात शिमगा... Nitesh Rane vs Aditya Thackeray
By ashish jadhao | Updated: February 10, 2022 15:53 IST2022-02-10T15:52:55+5:302022-02-10T15:53:10+5:30
संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मिळाला... पण त्यांच्या समोरच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत... आधी ४ फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं.. त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.. सुनावणीची तारीखही सतत पुढे पुढे गेली.. याच दरम्यान नितेश राणे हे आजारी पडले... आधी त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपाचासाठी दाखल केलं गेलं.. पण इथे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना पुन्हा कोल्हापुरात हलवलं गेलं...दोन दिवस नितेश राणे हे कोल्हापुरात सरकारी रुग्णालयात उपचार घेतायत.. त्यांचे विरोधक त्यांनी तब्येतीचं कारण दिलं यावरूनही त्यांच्यावर टीका करत होते.. पण आता नितेश यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येतेय...