पडळकर-पाटील वादाचा नवा अध्याय, पाहा नेमकं घडलं काय? Gopichand Padalkar | Jaynt Patil | BJP | NCP
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:49 IST2022-01-04T15:49:17+5:302022-01-04T15:49:38+5:30
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.. आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यातील एक महत्त्वाचे नेते मानले जातात.. याच पश्चिम महाराष्ट्रातून आलेले भाजपचे नेते गोपीचंद पडळकर सतत चर्चेत असतात.. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे.. काही दिवसांपूर्वीच पडळकर यांच्यावर सांगलीतल्या आटपाडी इथं प्राणघातक हल्ला झाला होता.. यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता.. यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुंपली होती.. त्यानंतर पडळकर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.. निमित्त ठरलंय जिल्हा बँकेच्या डायरीतून नाव वगळल्याचं.. नेमकं घडलं काय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून...