Next

कोरोनावर औषध, इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले? Indurikar Maharaj on Corona Medicine

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 14:31 IST2021-11-04T14:30:30+5:302021-11-04T14:31:51+5:30

इंदुरीकर महाराज म्हटलं की, किर्तनाला हमखास गर्दी होणार.. इंदुरीकर महाराज, गर्दी आणि हशा हे समीकरण महाराष्ट्रात वर्षानुवर्षे सुरु आहे. पण अलीकडच्या काळात इंदुरीकर महाराज आणि वाद असं नवं समीकरण तयार झालंय.. विनोदातून समाजप्रबोधन करताना कधी कधी किर्तनात ते काहीतरी बोलतात आणि वादाचा तमाशा उभा राहतो... नाशिकमध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा एक व्हिडीओ आता सध्या चर्चेत आलाय. या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर एक वक्तव्य केलं. आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असंही त्यांनी म्हटलंय. कोरोनावर एकच औषध असल्याचं देखील ते म्हणाले. इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले ? पहा..