माणसाला डुकराचं ह्रदय फीट बसलं, पण डुक्कराचं ह्रदय लावायची वेळ का आली? Pig Heart Transplant To Human
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:17 IST2022-01-13T18:16:54+5:302022-01-13T18:17:16+5:30
Pig Heart Transplant To Human : रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर मंडळी शेवटपर्यंत प्रयत्न करत असतात. रुग्णाला वाचवायचा असाच एक शेवटचा प्रयत्न अमेरिकेतल्या डॉक्टरांनीही केला. हा शेवटचा प्रयत्न करताना रुग्णाला चक्क डुक्कराचे ह्रदय लावलं आणि हार्ट ट्रान्सप्लंट म्हणजेच ह्रदय प्रत्यारोपण करुन दाखवलं. कदाचित तुम्ही हसण्यावारी ही बातमी न्याल पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की डुक्कराचं ह्रदय माणसाला फिट बसलं आणि आता तो रुग्ण अगदी ठणठणीतही आहे. कुठे झालं हे ऑपरेशन, अचानक डुक्कराचं ह्रदय लावायचा निर्णय डॉक्टरांनी का घेतला पाहुयात पुढच्या ३ मिनिटात...