MNS मधून बाहेर जाणाऱ्यांची यादी मोठी, पक्ष सोडण्यावर Bala Nandgaokar यांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:35 IST2021-12-17T16:35:14+5:302021-12-17T16:35:45+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करुन पक्षबांधणी करतायंत. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा कार्यकारिणीत अनेक महत्त्वाचे बदल केले, त्यामुळे अनेक जण दुखावले गेले. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर पोहचण्यापूर्वीच मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यातच राज ठाकरेंची सावली म्हणून ओळख असणारे बाळा नांदगावकर मनसे सोडणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. नांदगावकर पक्षाचा त्याग करणार किंवा पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता यावर बाळा नांदगावकर यांनीही मोठा खुलासा केला. काय म्हणाले नांदगाव आपल्याला पाहचंय पण त्याआधी पाहुयात बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांचं नातं काय आहे.