Next

चुंबन घेतानाचा सेल्फी, २०० कोटींची वसुली अन् EDच्या निशाण्यावर 'अशी' आली Jacqueline Fernandez

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:40 PM2021-12-06T16:40:08+5:302021-12-06T16:40:26+5:30

सलमान खानची एक्स गर्लफ्रेन्ड जॅकलिन फर्नांडिस भलतीच चर्चेत आहे कारण ती EDच्या रडारवर आहे. २०० कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी जॅकलिनची चौकशी सुरु आहे. तिच्याविरोधात ईडीनं समन्स जारी केले, ती चौकशीला आली नाही म्हणून लूकआऊट नोटीस काढली. अखेर तिला मुंबई विमानतळावरच रोखलं. जॅकलिन दुबईला जात होती, त्यावेळीच ईडीनं तिला विमानतळावर रोखलं. आता ही झाली बातमी. पण बातमीमागची बातमी अशी की जॅकलिन ईडीच्या रडारवर आली ती एका सेल्फीमुळे. एक सेल्फी जॅकलिनला भारी पडला अन् मग ईडीचा ससेमिरा आता जॅकलिनमागे लागला, पण असं काय होतं त्या सेल्फीत की जॅकलिनच्या मागे ईडी लागली, या सेल्फीचा आणि २०० कोटी अफरातफरीचा काय संबंध?