भाजपसोबत युतीचा निर्णय मीच घेणार, राज ठाकरेंकडून मनसैनिकांची कानउघडणी Raj Thackeray MNS-BJP Alliance
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:34 IST2021-12-17T16:34:03+5:302021-12-17T16:34:25+5:30
MNS-BJP Alliance in BMC election आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाण्यासाठी मनसेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. स्थानिक नेत्यांनी हा आग्रह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरही मांडला होता.. मात्र आता Raj Thackeray यांनी या स्थानिक नेत्यांची कानउघडणी करत भाजपाच्या जीवावर नाही तर स्वतःच्या कामावर आणि स्वतःच्या जीवावर निवडणूक जिंकण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत.. तसेच भाजपसोबत युती करायची झाल्यास त्याचा निर्णय मी स्वतः घेईन असे ठणकावून सांगितले..