Next

ही' मराठमोळी अभिनेत्री कतरिनाची जाऊबाई होणार? | Sharvari Wagh Katrina Kaif | Sunny Kaushal |

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 02:29 PM2021-12-27T14:29:38+5:302021-12-27T14:30:16+5:30

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्न केले. दोघेही हनिमूनहून परत आल्यानंतर शूटिंगमध्ये बिझी झाले आहेत. तर दुसरीकडे, या लग्नापासून विकी कौशल प्रमाणेच त्याचा लहान भाऊ सनी कौशल याच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.. मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासोबत त्याचे नाव जोडले जात आहे.. हे नाव महाराष्ट्रातील जनतेच्या ओळखीचं आहे, कारण शर्वरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याची नात आहे..शर्वरी व सनी यांनी ‘द फॉरगॉटन आर्मी’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं म्हटलं...