‘मुख्यमंत्री ठाकरे घरी बसलेत, त्यांचा पगार का कापत नाहीत?’ | Gunaratna Sadavarte on Uddhav Thackeray
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:29 IST2022-01-10T15:28:44+5:302022-01-10T15:29:12+5:30
एसटी संपावरुन गुणरत्न सदावर्ते विरुद्ध शिवसेना आमनेसामने आलेत. त्याचं झालं असं की एसटी संपाचं नेतृत्व गुणरत्न सदावर्ते करतायंत. याचदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे आजारी आहेत, घरुन काम करतायंत मग त्यांच्या पगारात मुख्य सचिवांनी कपात केली का मग एसटी कामगारांना हा न्याय का लावत नाही? असा झोंबणारा सवाल सदावर्तेंनी विचारला. आता त्यावरुन सदावर्तेंना शिवसेनेकडून टार्गेट केलं जातंय. सदावर्तेंवर शिवसेनेनं प्रखर शाब्दिक हल्ला चढवायला सुरुवात केलीय..