अनिल देशमुख यांना मोठा झटका, किरिट सोमय्या म्हणाले.. | Anil Deshmukh | Kirit Somaiya | ED raid
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 16:17 IST2021-11-08T16:17:17+5:302021-11-08T16:17:38+5:30
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढच होत आहे. ईडीच्या ७ नोटिसा आल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर होताच त्यांना अटक करण्यात आली. ईडीनं त्यांची कोठडी मागितली असूनही सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत अनिल देशमुखांना शनिवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. मात्र, यानंतर ईडीनं थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसांच्या ईडी कोठडीत केली आहे...