अजितदादांचा स्वॅग, आमदाराला म्हणतात |आता खिशातलं देऊ का?पाहा मजेदार किस्सा |Ajit Pawar | Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 15:54 IST2022-01-28T15:53:49+5:302022-01-28T15:54:07+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक शैली, रांगडा बाणा आणि जे आहे ते तोंडावर बोलायचं यासाठी ओळखले जातात. अजितदादांचा असाच किस्सा समोर आला. त्याचं झालं असं जिल्हा नियोजन बैठक सुरु होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून दादा या बैठकीला होते. यावेळी एका आमदारानं अजितदादांकडे वाढीव निधीची मागणी केली, फक्त मागणी करुन हा आमदार थांबला नाही तर सतत जोर लावायला लागला. तेव्हा दादा चिडले आणि त्यांच्या खास शैलीत आता काय खिशातून पैसा देऊ, इथं काय सौदा चालू हाय का असा खरमरीत सवाल विचारला. त्यानंतर एकच हशा पिकला.