Next

खंडेनवमीदिवशी अंबाबाईची तुळजाभवानी रूपात महापूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 17:19 IST2017-09-29T17:18:54+5:302017-09-29T17:19:25+5:30

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात खंडेनवमीनिमित्त शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची तुळजाभवानी देवी छत्रपतीशिवाजी महाराजांना तलवार देत असलेल्या रुपात पूजा बांधण्यात ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात खंडेनवमीनिमित्त शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची तुळजाभवानी देवी छत्रपतीशिवाजी महाराजांना तलवार देत असलेल्या रुपात पूजा बांधण्यात आली. गुरुवारी अष्टमीच्या जागराचा होम झाल्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता अंबाबाईचा गाभारा दर्शनासाठी उघडण्यात आला. त्यानंतर देवीचा अभिषेक व दुपारची आरती झाल्यानंतर अंबाबाईची तुळजाभवानी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. तुळजापूरची आदिमाया अंबा भवानी ही अष्टभूजा दुर्गा स्वरुप आहे.