Next

विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून दोघा मुलांना नग्न करुन मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 18:17 IST2018-06-15T18:17:50+5:302018-06-15T18:17:50+5:30

पहूर (जि. जळगाव) - विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले म्हणून सचिन चांदणे व राहुल चांदणे (रा. वाकडी, ता. जामनेर) या मातंग समाजाच्या दोघं तरुणांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे गेल्या रविवारी घडला. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांविरुद्ध बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :जळगावJalgaon