Next

जळगावमध्ये संतप्त ग्रामस्थांनी हॉटेल व्यावसायिकाची कार जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 16:47 IST2018-10-27T16:33:37+5:302018-10-27T16:47:06+5:30

जळगाव : जळगाव -औरंगाबाद मार्गावरील गाडेगाव (ता.जामनेर) येथे संतप्त ग्रामस्थांनी जळगावातील हॉटेल व्यावसायिक श्याम भंगाळे यांचे चारचाकी वाहन जाळल्याची ...

जळगाव : जळगाव -औरंगाबाद मार्गावरील गाडेगाव (ता.जामनेर) येथे संतप्त ग्रामस्थांनी जळगावातील हॉटेल व्यावसायिक श्याम भंगाळे यांचे चारचाकी वाहन जाळल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. काही दिवसांपूर्वी गाडेगाव येथे भंगाळे यांच्या भरधाव वाहनाने एस.टी. बसमध्ये चढणाऱ्या शाळकरी मुलांना चिरडले होते. त्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ग्रामस्थ भंगाळे यांच्यावर नाराज होते. आज त्यांचे वाहन दिसताच ग्रामस्थांनी त्याची जाळपोळ केली.