Next

अमानुषपणा! बिबट्याच्या बछड्याला शेपटीला धरुन फरफटत नेलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 17:23 IST2019-01-10T17:21:25+5:302019-01-10T17:23:55+5:30

तीन जणांनी बछड्याच्या शेपटीला धरुन फरफटत नेले. यात बछडा जखमी झाली. त्यानंतर उपचारादरम्यान बछड्याचा मृत्यू झाला.

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा गावशेजारील मसरामटोला येथे आसिफ गोंडील या शेतकऱ्याच्या शेतात रविवारी बिबट्याचा बछडा आढळला. यावेळी तीन जणांनी बछड्याच्या शेपटीला धरुन फरफटत नेले. यात बछडा जखमी झाली. त्यानंतर उपचारादरम्यान बछड्याचा मृत्यू झाला. वन विभागाने आसिफ गोंडील, प्रकाश पुराम, लोकेश कापगते या तीन जणांवर वन्यजीव अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.