धक्कादायक! चक्क वडिलांनीच काढली जिवंत मुलाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 22:54 IST2018-07-27T22:54:13+5:302018-07-27T22:54:49+5:30
आपल्या मुलाने नक्षल चळवळीत सहभागी होऊन अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला.
एटापल्ली (गडचिरोली) : आपल्या मुलाने नक्षल चळवळीत सहभागी होऊन अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्याच्या या कृत्यामुळे तो नक्षल चळवळीत असेपर्यंत आपल्यासाठी मेला आहे, असे सांगत नक्षल कमांडर महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा या नक्षल कमांडरच्या वडिलांनी शुक्रवारी येथे त्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यात बरेच लोक सहभागी झाले होते.