Next

Perspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 02:28 PM2018-08-14T14:28:48+5:302018-08-14T15:09:04+5:30

मुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय?, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय?, असे प्रश्न हल्ली काही वेळा ...

मुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय?, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय?, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.