Next

कोल्हापुरचे मावळे मर्दानी खेळाने गाजविणार राजपथ-72nd Republic Day India | Rajpath Program | Kolhapur

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 02:36 PM2021-12-27T14:36:29+5:302021-12-27T14:36:57+5:30

कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी पण कुस्ती बरोबरच अजून एक गोष्ट इथे आहे ती म्हणजे मर्दानी खेळ. कोल्हापुरी रांगडे गडी ह्या मर्दानी खेळाचे बाळकडूच घेतात. अन् मग मर्द मावळे इथे तुम्हाला दिसतात मर्दानी खेळ आणि कोल्हापुराची एक वेगळी प्रतिमा तयार करताना.. पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं हे कोल्हापूर. ह्या कोल्हापूरच्या मातीतला रांगडेपणा प्रत्येकाच्या रक्तात इथे तुम्हाला दिसून येतो. त्यामुळेच विविध खेळात निपुण असणारे रांगडे गडीच इथे तयार होतात.. कोल्हापुरच्या शिवाजी पेठेतील स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा ह्या मर्दानी खेळाच्या आखाड्यात तयार झालेल्या मर्द मावळ्यांनी तर कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.. अमृत महोत्सवी भारतीय प्रजसत्ताकदिना निमित्त होणाऱ्या राजपथावरील संचलनात कोल्हापुरचे हे मावळे कोल्हापूरचा रांगडा बाज असलेला मर्दानी खेळ सादर करणार आहेत. कोल्हापूरचा हा पहिलाच मर्दानी खेळाचा संघ आहे जो राजपथावरील संचलनात प्रात्यक्षिक सादर करणार आहे.