Next

Chala Hawa Yeu Dya Fame Shreya Bugde's Ganpati Visarjan | घरच्याघरी श्रेयाने दिला बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:34 PM2021-09-16T12:34:02+5:302021-09-16T12:34:33+5:30

श्री गणेशाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर पाच दिवसांच्या गणपती बाप्पांनी निरोप घेतला. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गणपतीचे विसर्जन हे समुद्र किनारी न करता अनेक जण कृत्रिम तलाव किंवा घरच्या घरीच बाप्पाचं विसर्जन करत आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्या घरी सुद्धा पाच दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले होते. पाचव्या दिवशी तिच्या घरच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आलंय. विशेष म्हणजे श्रेयाने तिच्या बाप्पाचं विसर्जन कोणत्याही समुद्र किनारी न करताना घरच्या घरीच केले आहे. श्रेयाने बाप्पाच्या विसर्जनाचे काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्य़े काचेच्या टॅंक सजवलेला पाहायला मिळतोय. त्यात गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं दिसून येतेय. तसेच तिचं कुटुंब ही बाप्पाचं विसर्जन करताना फोटोमध्ये दिसून येतायेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रेयाने सरकाराने दिलेले नियम पाळत घरच्या घरीच बाप्पाचं विसर्जन करण्याचा निर्णय घेतलाय.

 

टॅग्स :श्रेया बुगडेसेलिब्रिटी गणेशगणेशोत्सवShreya BugdeCelebrity GaneshaGanpati Festival