नांदुरा बसस्थानकात प्रेमी युगुलाला प्रेयसीच्या घरच्यांनी चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 15:00 IST2019-04-17T14:59:44+5:302019-04-17T15:00:40+5:30
मुलीच्या प्रेमप्रकरणाची भनक घरच्या मंडळीला लागली होती. त्यामुळे दोघांनाही यापूर्वी घरच्या मंडळींनी समज दिला होता. त्यानंतरही संबंधितांनी आपल्या वागणुकीत बदल केला नाही. त्यामुळे मुलीकडील मंडळी दोघांवरही पाळत ठेऊन होती.
प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणाºया एका प्रेमीयुगलाची मुलीच्या घराकडील मंडळीने धुलाई केली. ही घटना नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजताच्या घडली. काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेचा बघ्यांनी व्हिडीओही तयार केला. तर काहींनी हा व्हिडीओ चक्क सोशल मिडीयावर व्हायरल केला. यामुळे नांदुरा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.