Next

जीवनातील साडेसाती कशी दूर कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 13:00 IST2020-09-22T13:47:45+5:302020-09-30T13:00:14+5:30

आयुष्यात मनुष्य जीवन जगत असताना अनेक माणसांची साडेसाती ही त्याच्या पाचवीलाच पुजलेली असतात. माणसाची प्रगती काही लोकांना बघवत नसल्यामुळे ती लोक त्या व्यक्तीच्या मागे सारखे जळत राहतात किंवा काही कारणास्तव त्या व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. जीवन जगत असताना त्याला असंख्य संकटांना सामोरे जावे लागते. माणसामध्ये जर संकटे झेलण्याची ताकद असेल तर तो कोणत्याही संकटांचा यशस्वीपणे मुकाबला करू शकतो. परमेश्वर सुद्धा संकट अशा लोकांच्या आयुष्यात आणून देतो ज्यांच्यामध्ये ती संकटे झेलण्याची ताकद असते. म्हणूनच जीवनात साडेसाती कशी दूर कराल ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा