Next

चांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 12:59 IST2020-09-22T13:54:31+5:302020-09-30T12:59:34+5:30

आपल्या मनामध्ये सतत चांगल्या विचारांचे चक्र फिरत राहिले पाहिजे. आपल्या मनाला चांगले विचार हे अधिक प्रोत्साहन देतात आणि नवनविन संकल्पना आपल्या मनामध्ये येतात. चांगल्या विचारांची देवाणघेवाण जर आपल्या मनामध्ये सतत दरवळत असेल तर आपल्या बुद्धीला चालना मिळण्यास मदत होते. वाईट विचार आपल्या मनावर एकदा का बिंबवला गेला तर चांगला विचार आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी खूप अडचणी येतात. चांगल्या विचारांनी आपली विचार करण्याची क्षमता देखील कित्येक पटीने वाढत असते. मनामध्ये इतरांबद्दल आपण चांगले विचार नेहमी केले पाहिजे. आपल्या मनामध्ये एकसारखे वाईट विचार येण्यास सुरुवात झाली तर आपण डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे चांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन काय केले आहे ते आपल्याला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल