Next

झाडांचे बर्थ डे सेलिब्रेशन, पाहा हटके व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 16:06 IST2018-07-31T15:41:17+5:302018-07-31T16:06:46+5:30

अमरावती : वनविभागाद्वारे मागील वर्षी चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम शासनाने पार पाडला. यावर्षी शासनाचे उद्दिष्ट हे 13 कोटी ...

अमरावती : वनविभागाद्वारे मागील वर्षी चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम शासनाने पार पाडला. यावर्षी शासनाचे उद्दिष्ट हे 13 कोटी वृक्षारोपणाचे होते. झाडे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावले तरी ते महत्त्वाचे ठरेल ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्यात आली. मागील वर्षी लावण्यात आलेली झाडे यशस्वी जगविण्यात आली, त्याचे पालनपोषण वनविभागाचे प्रफुल्ल फरतोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आज त्यांना एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त वनविभागाने गांडूळ खत व शेणखत यांचा केक तयार करून झाडांचा वाढदिवस साजरा केला. (व्हिडिओ- मनिष तसरे)