राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत आहेत, शेतक-यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 14:12 IST2017-12-07T14:11:11+5:302017-12-07T14:12:41+5:30
अहमदनगरमधील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर गुरुवारपासून (7 डिसेंबर) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ...
अहमदनगरमधील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर गुरुवारपासून (7 डिसेंबर) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. दरम्यान, यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत असल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला.