शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. लघुसिंचन विभाग प्रभा-यांच्या भरवश्यावर

By admin | Updated: October 10, 2014 00:54 IST

रिक्त पदाचे ग्रहण कायम : सिंचन विकासात आली आडकाठी.

वाशिम : जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग आजमितीला प्रभार्‍यांच्या भरवश्यावर मार्गक्रमण करीत आहे. कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांकडे वाढलेला कामाचा व्याप पाहता कर्तव्याला न्याय देणे कठीण बनले असून ग्रामविकासाची जननी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या या महत्वपूर्ण विभागाकडे लक्ष देईल का हा खरा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे 0 ते १00 हेक्टरपर्यंतच्या लघुसिंचन योजनांसह पाझर तलाव, गावतलाव, कोल्हापूरी बंधारे व त्यांच्या दूरुस्तीची कामे, रब्बी कामे, पावसाळ्य़ात प्रभावीत झालेली कॅनॉल दूरुस्तीची कामे, विदर्भ सधन सिंचन योजना आदी कामे प्राधान्याने केली जातात. ग्रामविकासाची जननी असलेल्या जिल्हा परिषदेच्या या महत्वपूर्ण विभागाला मात्र गेल्या कित्येक महिण्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पद रिक्त असून त्यानंतर कामाची जबाबदारी असणारे उपकार्यकारी अभियंता पदही रिक्त आहे. उपअभियत्याची एकूण चार पदे आहेत. त्यापैकी दोन पदे रिक्त असून दोन पदावर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. शाखा अभियांत्याची एकूण २४ पदे आहेत. त्यापैकी तब्बल १६ पदे रिक्त असून कार्यरत असलेल्या आठ शाखा अभियंत्यांपैकी दोघे निलंबीत व एक शाखा अभीयंता दीर्घ रजेवर असल्याने केवळ पाच शाखा अभियंता कार्यरत आहेत. कार्यरत असलेल्या पाच शाखा अभियंत्यांपैकी दोघांकडे उपअभियंता पदाचा प्रभार आहे. स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यकाची चार पदे असून ही चारही पदे रिक्त आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अधिकारी कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याने लघूसिंचन विभागांतर्गत कामांचे नियोजन पूरते कोलमडले असून कामाचे नियोजन करावे तरी कसे असा प्रश्न कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांना पडला आहे.