कारंजात जुन्या वादातून एका युवकाचा खून; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:15 IST2018-01-16T14:11:12+5:302018-01-16T14:15:08+5:30
कारंजा लाड : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली.
_201707279.jpg)
कारंजात जुन्या वादातून एका युवकाचा खून; आरोपीला अटक
कारंजा लाड : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कारजा शहर पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवसी आरोपीला अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमानवे गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भाडणाच्या कारणावरून आरोपी मंगेश गजाजन काळे वय २२ रा . शिवाजीनगर याने सचिन उर्फ दत्ता वसंतराव सस्ते वय २८ रा . शिवाजीनगर यांच्या सोबत वाद करून लाथा बुक्याने मारहाण करून चाकूने पोटात वार केले . त्यात सचिन सस्ते चा जागीच मूत्यू झाला, अशी फिर्याद मुतकाची आई अजनाबाई वसंतराव सस्ते यांनी दिली. फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी आरोपी मंगेश गजानन काळे याच्या विरुद्ध ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार एम एम बोडखे करीत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवले व ठाणेदार एम एम बोडखे १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या घटनास्थळी दाखल झाले.