मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:31 IST2019-11-09T15:31:07+5:302019-11-09T15:31:15+5:30
पैसे न देण्याचा राग मनात ठेउुन आरोपीने अमोल शिंदे च्या डोक्यावर काठीने मारहान केली.

मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून झालेल्या भांडणाचे रुपांतर मारहणीत होवून यामध्ये जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.
कांरजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेर्डा बु. येथील नंदु आठवले याला दारू पिण्याचे व्यसन होते. तसेच दारू पिण्यासाठी तो कुणालाही पैसे मागायचा. अशातच गुरूवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपीने मुंबई येथे नोकरीला असलेल्या व खेर्डा येथील रहिवासी अमोल शिंदे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे न देण्याचा राग मनात ठेउुन आरोपीने अमोल शिंदे च्या डोक्यावर काठीने मारहान केली. त्यात अमोल शिंदे गंभीर जखमी झाला व रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेउुन मृतक अमोलला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथील सर्वोपचार केंद्रात नेण्याचा सल्ला उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार, अमोल शिंदेला रात्री साडे ११ वाजता उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार केंद्रात दाखल केले; परंतू उपचारा दरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान कारंजा ग्रामीण पोलीसांनी आरोपी नंदु आठवले याला ताब्यात घेतले आहे.