शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

४५ अंश तापमानात युवकांची कालव्यात जलक्रिडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 3:05 PM

युवक मंडळी शरीराचा थकवा आणि उन्हाचा दाह घालविण्यासाठी शिवारात असलेल्या कालव्यात जलतरणाचा आनंद लुटत आहेत.

इंझोरी (वाशिम): मे महिना संपल्यानंतरही जिल्ह्यात उन्हाचा पारा ४४ अंशाच्यावर असताना शरीराची दाहकता घालवून उत्साह वाढविण्यासाठी प्रकल्पाच्या कालव्यात युवक मंडळी जलतरणाचा आनंद घेत असल्याचे चित्र इंझोरी परिसरात पाहायला मिळत आहे. जून महिना सुरू झाला असला तरी, उन्हाची दाहकता कमी होण्याची कुठली चिन्हे अद्याप दिसत नाहित. उन्हाचा पारा आताही ४३ अंशावरच आहे. या उन्हामुळे जिवाची लाही लाही होत असून, उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रत्येक जण उन्हापासून बचावासाठी वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. शितपेय प्राशन करून घशाची कोरड मिटविणे, सावलीत झाडाचा हवेशीर आधार घेणे किंवा घरातच कुलरमध्ये विश्रांती करण्यावर भर दिला जात आहे; परंतु शेतात रखरखत्या उन्हात काम करणाºया मंडळींना मात्र रखरखत्या उन्हात काम करून दमल्यानंतर झाडाखाली आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. अशात काही युवक मंडळी शरीराचा थकवा आणि उन्हाचा दाह घालविण्यासाठी शिवारात असलेल्या कालव्यात जलतरणाचा आनंद लुटत आहेत. कारंजा तालुक्यात आणि मानोरा तालुक्याच्या काठावर म्हसणीनजिक असलेल्या अडाण प्रकल्पातून शेतकºयांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कालवे तुडूंब भरून वाहत असल्याने युवक मंडळी तासनतास या कालव्यात मनसोक्त जलतरण करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी