पीक नुकसान : ‘डाटा एन्ट्री’चे काम ८० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:44 PM2019-11-13T14:44:54+5:302019-11-13T14:45:05+5:30

डाटा एन्ट्री तातडीने पूर्ण करून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे.

Yield loss: Data entry work is 80% complete | पीक नुकसान : ‘डाटा एन्ट्री’चे काम ८० टक्के पूर्ण

पीक नुकसान : ‘डाटा एन्ट्री’चे काम ८० टक्के पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनाम पूर्ण झाल्यानंतर या पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २.७९ लाखांहून अधिक हेक्टर नुकसाग्रस्त क्षेत्रापैकी ८० टक्के पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची ८० टक्के अचूक डाटा एन्ट्री प्रशासनाने केली असून, आता उर्वरित २० टक्के पंचनाम्यांची डाटा एन्ट्री तातडीने पूर्ण करून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. अंतिम अहवाल तयार करून प्रशासन ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार मदत निधीची मागणी शासनस्तरावर नोंदविणर आहे.
जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यात प्रामुख्याने काढणी केलेले सोयाबीन, कपाशीसह फळपिके आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले. महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करून या नुकसानाचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाकडून विहित प्रपत्रात पंचनाम्यातील माहिती समाविष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले.
सुटीच्या दिवशीही तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह अन्य सर्व कर्मचारी तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालयातील हजर राहून कर्मचाऱ्यांनी ‘डाटा एन्ट्री’चे काम केले. त्यामुळेच जिल्ह्यातील ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानाच्या पंचनाम्यांपैकी ८० टक्क्यांवर पंचनाम्यांची अचूक डाटा एन्ट्री करणे प्रशासनाला शक्य झाले.
दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून, या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यासाठी बुधवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत उर्वरित पंचनाम्यांची डाटा एन्ट्री करून विभागीय आयुक्तांसह पीक विमा कं पनीकडे नुकसानभरपाईच्या मागणीचा अहवाल सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
 
कर्मचाºयांनी मंगळवारच्या सुटीलाही केले कामकाज
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची कामे ८ नोव्हेंबरअखेर पूर्ण झाली. दरम्यान, ९ नोव्हेंबरपासून ‘डाटा एन्ट्री’चे काम प्रशासनाने हाती घेतले. यादिवशी दुसरा शनिवार असल्याने सुटी होती, त्यानंतर रविवारची सुटी होती; मात्र दोन्ही दिवशी कर्मचाºयांनी कामकाज केले. यासह मंगळवारी गुरूनानक जयंतीची सुटी असतानाही कामकाज सुरू असल्याचे दिसून आले.


पीकविमा न भरणाºया शेतकºयांचा स्वतंत्र अहवाल
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांना बसला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ३१५६२, रिसोड तालुक्यातील ३४२८७, मालेगाव तालुक्यातील ३०१६९, मंगरुळपीर तालुक्यातील २९२७४, मानोरा तालुक्यातील १६८४९, तर कारंजा तालुक्यातील ३२२१६ शेतकºयांचा समावेश आहे. त्यात पीक विमा भरणाºयांसह पीक विमा न भरणाºया शेतकºयांचाही समावेश आहे. पीक विमा भरणाºया शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. तर पीक विमा न भरणाºयांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारांचे स्वतंत्र अहवाल प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येत आहेत.


वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या बाधित क्षेत्रापैकी ८० टक्के पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ पूर्ण झाली आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर हे काम केले असून, आता उर्वरित पंचनाम्यांची डाटा एन्ट्री करून विभागीय आयुक्तांकडे अंतिम अहवाल बुधवार सायंकाळपर्यंत सादर करण्यात येणार आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी
वाशिम

Web Title: Yield loss: Data entry work is 80% complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.