शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून जलसंधारणाची कामे!

By admin | Updated: April 19, 2017 01:14 IST

जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे श्रमदान : कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन दान

कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील ग्राम जानोरी व जयपूर येथील जलसंधारणाच्या कामात जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, संवर्धन संस्थेचे डॉ. नीलेश हेडा व नायब तहसीलदार, महसूल कर्मचारी , मंडळ अधिकारी, तलाठी वर्गाने भेट देऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जानोरी येथे शेताच्या बांधबंदिस्त कामासाठी श्रमदान केले. जयपूर येथे श्रमदानातून तयार केलेल्या ५०० मीटर सीसीटीच्या कामाची पाहणी व शेततळयाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी युवा संस्थेचे वसंता इंगळे यांनी श्रमदानातून पुढे येणाऱ्या गावासाठी १०० टिकास, १०० फावडे व १०० टोपले भेट दिले. यापैकी काही साहित्याचे वाटप जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते जयपूर सरपंच विजय काळे यांना भेट दिले. याप्रसंगी जयपूरचे ग्रामसेवक नरेश गजभिये यांनी एक महिन्याचा पगार जलसंधारणाच्या कामी दिला. यासंदर्भातचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जयपूर सरपंचांना दिला. तसेच काकडशिवणी ग्रामसेवक ठोकबर्डे, तांत्रिक अधिकारी सचिन उदरे यांनीसुद्धा एक महिन्याचा पगार जलसंधारणाच्या कामी दिल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तिघांचा सत्कार केला. श्रमदान करत असलेल्या गावकऱ्यांसोबत द्विवेदी यांनी संवाद साधला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन गावाला पाणीदार करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. --