पेटखदानपूर वीज उपकेंद्राचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:16 IST2018-08-28T14:16:09+5:302018-08-28T14:16:11+5:30
जोगलदरी: मंगरुळपीर तालुक्यातील पेट खदानपूर या वीज उपकेंद्राचे काम ६ वर्षांपासून अर्धवटच आहे. सदर उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून ते कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन केले.

पेटखदानपूर वीज उपकेंद्राचे काम संथगतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगलदरी: मंगरुळपीर तालुक्यातील पेट खदानपूर या वीज उपकेंद्राचे काम ६ वर्षांपासून अर्धवटच आहे. सदर उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून ते कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत महावितरणच्यावतीने सदर केंद्राचे काम सुरू करून येथून ५ गावांना वीत पुरवठाही सुरू केला; परंतु इतर कामे संथगतीने सुरू आहेत.
मंगरुळपीर तालुक्यात दाभा सर्कलमधील सावरगाव, जोगलदरी, लावणासह परिसरातील १५ गावांची वीज समस्या सोडविण्यासाठी जवळपास ५ वर्षांपूर्वी पेट खदानपूर येथे वीज उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. या उपकेंद्रामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांची वीजे संदभार्तील समस्याही सुटणार असल्याने या गावांतील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या वीज उपकेंद्राचे कामही सुरू करण्यात आले; परंतु आता पाच वर्षे उलटली तरी, या उपकेंद्राचे काम पूर्णत्वास गेले नाही. या उपकेंद्राचे काम पूर्ण करून ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली होती. याची दखल घेण्यात येत नसल्याने अखेर मानोरा-मंगरुळपीर मार्गावरील लावणा फाट्यावर शनिवार ११ आॅगस्ट रोजी शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनाची दखल महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांनी घेतली आणि शिवसेनच्या शहर अध्यक्षांना लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानुसार महावितरणला येत्या ६ पर्यंत या वीज उपकें द्राचे काम पूर्ण करायचे होते. त्यानुसार या वीज उपकेंद्राचे काम सुरू करून येथून ५ गावांना वीज पुरवठाही सुरू करण्यात आला; परंतु इतर कामे संथगतीने सुरू आहेत. विशेष म्हणजे महावितरणच्या पत्रानुसार पार्डी ताड येथील जीर्ण वीज तारा, झुकलेले खांब, दलिवस्तीसाठी वाढीव खांबांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला असला तरी, त्याला मंजुरी मिळाली नाही. त्याशिवाय सायखेडा, जोगलदरी येथील जीर्ण खांब आणि तारांची समस्याही कायमच आहे.