महिला वाहकांच्या विश्रामगृहाचा प्रश्न ८ वर्षांपासून प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:53 IST2018-09-14T13:53:53+5:302018-09-14T13:53:58+5:30
वाशिम : एस.टी.बसमध्ये कर्तव्यावर चढण्यापूर्वी आणि कर्तव्य आटोपल्यानंतर घरी परतण्यापूर्वी महिला वाहकांना काहीवेळ विश्रांती घेता यावी यासह इतर स्वरूपातील सोपस्कार पार पाडता यावे, यासाठी सुसज्ज विश्रामगृहाची नितांत गरज भासत आहे.

महिला वाहकांच्या विश्रामगृहाचा प्रश्न ८ वर्षांपासून प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एस.टी.बसमध्ये कर्तव्यावर चढण्यापूर्वी आणि कर्तव्य आटोपल्यानंतर घरी परतण्यापूर्वी महिला वाहकांना काहीवेळ विश्रांती घेता यावी यासह इतर स्वरूपातील सोपस्कार पार पाडता यावे, यासाठी सुसज्ज विश्रामगृहाची नितांत गरज भासत आहे. मात्र, साधारणत: ८ वर्षांपूर्वी वाशिमच्या आगार परिसरात सुरू झालेले तथा ‘लेंटल लेव्हल’पर्यंत येऊन बंद पडलेले काम अद्यापपर्यंत सुरू होऊ शकले नाही. परिणामी, महिला वाहकांना जाणवणारी अडचण आजही कायम असल्याने त्यांच्यातून आगार व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराप्रती रोष व्यक्त होत आहे.
कधीकाळी केवळ पुरूषांचीच मक्तेदारी असणाºया विविध क्षेत्रांमध्ये आज महिला पूर्ण ताकदीने कार्य करित आहेत. मात्र, त्यांना अपेक्षित असलेल्या सोयी-सुविधा पुरविण्याकामी प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. वाशिमच्या एस.टी. आगार परिसरात साधारणत: ८ वर्षांपूर्वी महिला वाहकांकरिता सुसज्ज विश्रामगृह इमारत उभारण्यासाठी पुरेसा निधी मंजूर झाला. त्यातून ‘लेंटल लेव्हल’पर्यंत काम पूर्ण झाले. मात्र, त्यानंतर आजतागायत हे काम ८ वर्षांपूर्वीच्याच स्थितीत पडून असल्याचे दिसून येत आहे. इमारतीवर स्लॅब टाकणे, आतून-बाहेरून प्लस्टर करण्यासह अन्य सुविधा पुरविण्यात आल्यास महिला वाहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
महिला वाहकांच्या विश्रामगृहाचे रखडलेले काम सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक हालचाली सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी विभाग नियंत्रकांनी देखील कामाची पाहणी केली. हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे प्रयत्न आहे.
- व्ही.एम.इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम