रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:08 IST2020-03-01T18:08:27+5:302020-03-01T18:08:40+5:30
तूर जमा करीत असताना अचानक रानडुकर आले आणि वंदना विजय खोडके या शेतमजुर महिलेवर हल्ला चढविला.

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंंभीर जखमी
रिसोड : शेतात काम करीत असताना रानडुकराने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रिसोडपासून काही अंतरावर असलेल्या शेगाव खोडके शेतशिवारात १ मार्च रोजी दुपारी घडली. सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथील काही शेतमजूर महिला शेतात तूर जमा करण्यासाठी गेल्या होत्या. तूर जमा करीत असताना अचानक रानडुकर आले आणि वंदना विजय खोडके या शेतमजुर महिलेवर हल्ला चढविला. अचानक चढविलेल्या या हल्ल्यामुळे शेतमजूरांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. वंदना खोडके यांच्या उजव्या पायाला जबर चावा घेऊन गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत वंदना खोडके यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. रिसोड ग्रामीण रुग्णालयात रॅबीज इंजेक्शन नसल्याने पुढील उपचारार्थ सदर महिलेला अकोला येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.