समृद्धी महामार्गावर कारच्या अपघातात महिला ठार, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 06:14 IST2023-03-07T06:13:48+5:302023-03-07T06:14:15+5:30

हा अपघात समृद्धी महामार्गावरील वनाेजाजवळ  साेमवारी सकाळी घडला.   

Woman killed one injured in car accident on Samruddhi express Highway | समृद्धी महामार्गावर कारच्या अपघातात महिला ठार, एक जखमी

समृद्धी महामार्गावर कारच्या अपघातात महिला ठार, एक जखमी

शेलू बाजार (वाशिम) : चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार लाेखंडी कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर एकजण जखमी झाला आहे. हा अपघातसमृद्धी महामार्गावरील वनाेजाजवळ  साेमवारी सकाळी घडला.   

गुजरात येथील गोयल दाम्पत्य समृद्धी महामार्गाने नागपूरकडे कारने जात असताना सोमवारी सकाळी वनोजानजीक कारचा (क्र. जीजे २७-के ८२७१) अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गालगत असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील  सीमा गोयल या जागीच ठार झाल्या, तर सुरेंद्र गोयल हे जखमी झाले.

अपघाताबाबत समजताच सामाजिक कार्यकर्ते गोपाल राऊत, स्वप्नील चौधरी यांनी तत्काळ मदत  केली. कारचा दरवाजा तोडून व काचा फोडून अपघातग्रस्तांना बाहेर काढले. तसेच टोल नाक्यावरील ॲम्ब्युलन्स व १०८ ॲम्ब्युलन्सला त्वरित माहिती देऊनही बराच वेळ वाट पाहावी लागली. वेळीच मदत मिळाली नसल्याने अपघातग्रस्त दगावण्याची चर्चा होती.

Web Title: Woman killed one injured in car accident on Samruddhi express Highway