शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कानांचं सोडा, हृदय-फुप्फुसाचं काय?

By admin | Updated: October 22, 2014 00:34 IST

फटाक्यांचा अट्टाहास येऊ शकतो अंगलट : फटाक्यातील रासायनिक पदार्थाचा मानवी शरिरावर परिणाम.

वाशिम : फटाक्यांचा आवाज कर्णबधिरता आणू शकते, याची पूर्वकल्पना साधारणत: सर्वांनाच आहे. मात्र, फटाक्यांमधील रासायनिक पदार्थ शरिराच्या अनेक घटकांवर घातक परिणाम करीत असल्यावर अनेकजण अनभिज्ञ असतात. आवाजापेक्षा रासायनिक पदार्थांचा हृदय व फुप्फुसावरील दुरगामी परिणामाचे भान ठेवूनच दिवाळीत फटाक्यांचे बार उडविणे काळाची गरज ठरत आहे.दिवाळीत फटाक्यांचे बार उडविण्यासाठी परीक्षा आटोपताच बच्चे कंपनीने नियोजन केले आहे. मात्र, दूरगामी परिणाम लक्षात घेता सावधानता बाळगूनच फटाक्यांचा आनंद घेणे गरजेचे ठरत आहे. ध्वनिप्रदुषण कमी करण्यासाठी पर्यावरणपुरक फटाक्यांची विक्री तेजीत आहे. पर्यावरणापूरक दावा करणारे यातील अनेक फटाके आवाजापेक्षाही घातक रासायनिक पदार्थाचा उत्सर्ग करीत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चायना मेड फटाक्यांमुळे कानांपेक्षा किडनी, डोळे, ह्रदय, फुप्फुस यांचीच काळजी अधिक घ्यावी लागणार आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेनुसार दिवाळी काळातील पाच वेळेतील आवाजाची तीव्रता अधिक असते. सरासरी ३0 ते ४0 डेसिबलहून अधिक प्रमाणात ध्वनिप्रदुषण होत असते. सध्या ध्वनिप्रदुषण टाळणारे कमी आवाजाचे अनेक फटाके बाजारात दाखल झाले आहेत. आकर्षक पॉकिंगसह पर्यावरण पुरकतेचा दावा करणार्‍या या फटाक्यांची मागणीही वाढत आहे. कर्णमधुर आवाजाबरोबरच हिरवा, सोनेरी व गुलाबी रंगाची बरसात करणारे हे फटाके अनेक विषारी रासायनिक पदार्थ वातावरणात सोडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या फटाक्यांत जस्त, तांबे, लोखंड, अँल्युमिनियम आदींचा वापर केला जातो. अशा धातुंच्या संयोगाने सल्फरडाय ऑक्साईड, पोटॅशियम नायट्रेट, बेरियमसाररखे शरीरावर अत्यंत दुरगामी परिणाम करणारे घटक उत्सर्जित होतात. त्यामुळे डोळयांचा विकार, झोप न लागणे, ह्रदय जोरात धडधडणे, रक्तदाब, मळमळणे, लिव्हरचा त्रास, किडनी व फुप्फुसाचे आजार उदभु शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले.