तरुण क्रांती स्वाभिमान यात्रेचे मंगरुळपीर येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:28 IST2018-08-10T12:27:24+5:302018-08-10T12:28:24+5:30

मंगरुळपीर : विविध सामाजिक उपक्रमासाठी वाशिम येथून ८ आॅगस्ट रोजी निघालेल्या तरुण क्रांती स्वाभिमान यात्रेचे शहरात स्वागत करण्यात आले.

Welcoming the youth revolution Swabhiman Yatra to Mangrulpir | तरुण क्रांती स्वाभिमान यात्रेचे मंगरुळपीर येथे स्वागत

तरुण क्रांती स्वाभिमान यात्रेचे मंगरुळपीर येथे स्वागत

ठळक मुद्देभाजप नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. वाशिम येथून निघालेली ही यात्रा १५ आॅगस्ट रोजी हरिद्वार येथे पोहोचणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : विविध सामाजिक उपक्रमासाठी वाशिम येथून ८ आॅगस्ट रोजी निघालेल्या तरुण क्रांती स्वाभिमान यात्रेचे शहरात स्वागत करण्यात आले.
या यात्रेत सहभागी असणाºयांचा भाजप नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तरुण क्रांती मंचचे वाशिम जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी हे या यात्रेचे संयोजक असून वाशिम येथून निघालेली ही यात्रा १५ आॅगस्ट रोजी हरिद्वार येथे पोहोचणार आहे.  योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेत निलेश सोमाणी यांचेसह कैलास भालेराव,ओमप्रकाश काटेकर, संजय भांदुर्गे,अश्विन लढढा, गोविंद सोमाणी, विष्णू इंगळे, सतीश मांदळे, संतोष कारकर यांचा समावेश असून यात्रेदरम्यान शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब व गोरगरीब आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांना मदत करण्यात येणार आहे.  त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत. या यात्रेकरूंचा शहरात व्यापारी मंडळाने सत्कार केला. यावेळी नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे,भगवान दास जाखोटीया, प्रमोद भन्साली, किशोर भुतडा,राजेश जाखोटीया,योगेश तापडीया, रुपेश तिवारी,राजेश दबडे,नितीन बोरकर,जमिरभाई,निलेश राठोड,चंदुभाऊ कांबळे,योगेश बुधे, शैलेश इंगोले,रवी चौधरी,शौकतभाई आदींची उपस्थिती होती.

Web Title: Welcoming the youth revolution Swabhiman Yatra to Mangrulpir