शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: May 1, 2017 00:20 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.

हजारो लिटर पाणी रस्त्यावर : दिग्रस शहरात पाणीटंचाईचे उग्ररूप दिग्रस : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. उन्हाळ्यात एक दिवसाआड तेही अल्प पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे, तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पातून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. पाण्यासाठी रात्ररात्र जागणाऱ्या दिग्रसकरांना वाहून जाणारे पाणी पाहून संताप येत आहे. दिग्रस शहरानजीक जिल्ह्यातील सर्वात मोठा अरुणावती प्रकल्प आहे. या प्रकल्पाहून मानोरा, वाशिम, दारव्हा आणि दिग्रस शहराला पाणीपुरवठा केला जातो. गत काही दिवसांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेकांच्या नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. दिग्रस शहरात होणारा पाणीपुरवठा नियमित करावा, अशी नागरिकांची मागणी असते. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पावरून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर वॉलमधून पाण्याचे कारंजे उडत आहे. या वॉलमधून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जाते. शहरातील अनेकजण या वॉलमधून पाणी भरताना दिसतात. परंतु रस्त्याच्या बाजूला पाण्याचे लोट वाहताना दिसत आहे. एकीकडे दिग्रस शहरात पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे पाण्याचा अपव्यय पाहण्याची वेळ दिग्रसकरांवर आली आहे. याबाबत वरिष्ठांना सूचनाही देण्यात आली आहे. परंतु गत काही दिवसांपासून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. हजारो लिटर पाणी वाहून जाताना पाहून दिग्रसकरांचा संताप अनावर होत आहे. या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी आणि दिग्रसला मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) ग्रामीण भाग होरपळतोय दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. नळयोजना भारनियमनामुळे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अरुणावती प्रकल्पात प्रचंड जलसाठा डोळ्याने पाहताना या नागरिकांना पाण्यासाठी मात्र भटकंती करावी लागत आहे.