तांत्रिक अडचणींमध्ये अडकली तीन गावांची पाणीपुरवठा योजना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:58 IST2018-02-27T14:58:29+5:302018-02-27T14:58:29+5:30
जऊळका रेल्वे (वाशिम) : जऊळका रेल्वेसह उडी आणि वरदरी बु. या तीन गावांकरिता साधारणत: १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण ताकदीने कार्यान्वित होऊ शकली नाही.

तांत्रिक अडचणींमध्ये अडकली तीन गावांची पाणीपुरवठा योजना!
जऊळका रेल्वे (वाशिम) : जऊळका रेल्वेसह उडी आणि वरदरी बु. या तीन गावांकरिता साधारणत: १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण ताकदीने कार्यान्वित होऊ शकली नाही. जलशुद्धीकरणाच्या इमारतीची रंगरंगोटी करण्याव्यतिरिक्त इतर कुठलीही कामे मार्गी लागू शकली नाहीत. यामुळे परिसरातील शेकडो ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
महाराष्टÑ जीवन प्राधिकरण योजनेअतर्गंत १८ वर्षांपूर्वी जऊळका रेल्वे, उडी, वरदरी बु. या तीन गावांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जऊळका रेल्वे येथे जलकुंभ आणि जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, याअंतर्गत अद्याप पाणीपुरवठा झालेला नाही. जऊळका गावालगत काटेपूर्णा नदिवर चाकातिर्थ प्रकल्पाची निर्मीती झाली. तेथूनच तीन गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार होता; परंतू तांत्रिक अडचणींमध्ये योजना फसल्याने ही बाब अद्याप शक्य होऊ शकली नाही.
दरवर्षी लाखो रुपये खर्च करुन थातूर- मातूर योजना चालू करुन पाणीपुरवठा योजना सुरु असल्याचा केवळ देखावा केल्या जात आहे. जऊळकानजिक असलेल्या प्रकल्पाचाही ग्रामस्थांना कुठलाच फायदा होत नाही. तसेच शेतीला सिंचन करण्याची शेतकºयांची इच्छा आहे; पण रेल्वे लाईन गेल्यामुळे पाईपलाईन घेण्यासाठी परवानगी काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. एकूणच या सर्व अडचणींमुळ जऊळका रेल्वे, उडी आणि वरदरी बु. या तीन गावांमधील ग्रामस्थांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.