कुरळा धरणातून मालेगावला पाणीपुरवठा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:24 IST2018-04-16T18:24:59+5:302018-04-16T18:24:59+5:30

मालेगाव (वाशिम) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हे काम विहित मुदतीत पूर्ण केले असून १६ एप्रिलपासून मालेगावकरांना याव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. 

Water supply to Malegaon fro kurala dam | कुरळा धरणातून मालेगावला पाणीपुरवठा सुरू!

कुरळा धरणातून मालेगावला पाणीपुरवठा सुरू!

ठळक मुद्दे चाकातिर्थ प्रकल्पावरून कुरळा धरणात पाणी सोडण्यासाठी १.३४ कोटी रुपयांचा निधी खर्चून पाईपलाईन टाकण्यात आली. संबंधित यंत्रणेने दिवसरात्र मेहनत घेवून पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत पूर्ण केले आणि १६ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.


मालेगाव (वाशिम) : शहराला पाणीपुरवठा करणाºया कुरळा प्रकल्पाची पाणीपातळी शून्यावर पोहचल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू होती. दरम्यान, हा प्रश्न निकाली काढण्याकरिता चाकातिर्थ प्रकल्पावरून कुरळा धरणात पाणी सोडण्यासाठी १.३४ कोटी रुपयांचा निधी खर्चून पाईपलाईन टाकण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हे काम विहित मुदतीत पूर्ण केले असून १६ एप्रिलपासून मालेगावकरांना याव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. 
मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान-मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी चाकातिर्थ प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने या प्रकल्पातून कुरळा धरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसह इतर संबंधित यंत्रणांकडे पाठविला होता. त्यास १२ फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाली आणि योजनांतर्गत काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यानुसार, ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर पाईपलाईन टाकण्याच्या कामाची जबाबदारीस सोपविण्यात आली होती. त्यानुसार, संबंधित यंत्रणेने दिवसरात्र मेहनत घेवून पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत पूर्ण केले आणि १६ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

Web Title: Water supply to Malegaon fro kurala dam