माळेगाव येथे पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:21 IST2019-06-05T15:20:50+5:302019-06-05T15:21:17+5:30
वाशिम : वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणी भरण्यासाठी गावकºयांची झुंबड उडत आहे.

माळेगाव येथे पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणी भरण्यासाठी गावकºयांची झुंबड उडत आहे.
वाशिम ते शेलुबाजार मार्गावर असलेल्या माळेगाव येथे दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. विशेष म्हणजे सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माळेगाव येथे जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. माळेगाव येथे पाण्याची गरज पूर्ण होत असल्याच्या अहवालावरून या गावाचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’ यादीत करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असते. ‘वॉटर न्यूट्रल’ अहवालावरून माळेगाव येथे जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. गावातील तीव्र स्वरुपातील पाणीटंचाई लक्षात घेता यावर्षी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. टँकरद्वारे पाणी विहिरीत सोडले जात असून, पाणी भरण्यासाठी गावकºयांची एकच झुंबड उडत आहे.