लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:30 IST2018-12-22T16:29:33+5:302018-12-22T16:30:33+5:30
आसेगाव (वाशिम): पावसाळा उलटून दोन महिनेही होत नाही, तोच आसेगाव परिसरातील लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे.

लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम): पावसाळा उलटून दोन महिनेही होत नाही, तोच आसेगाव परिसरातील लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, रब्बी हंगामातील गहू पिकालाही पुढे सिंचनासाठी पाणी मिळणार की नाही, अशी भिती यामुळे निर्माण झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडल्याने आसेगाव परिसरातील प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. प्रकल्प काठोकाठ भरल्याने शेतकºयांनी रब्बी हंगामाची पेरणी झपाट्याने उरकली. यंदा या परिसरात गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढली झाली. तथापि, पावसाळा संपून दोन महिने होत नाही तोच परिसरातील प्रकल्पांची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. आसेगाव परिसरातील आसेगाव बांध, तसेच सार्सी, चिंचखेड, पिंपळगाव, नांदगाव येथील लघू प्रकल्पात सद्यस्थितीत ६० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने होत असलेली घट पाहता. रब्बी हंगामातील गहू पिकाच्या सिंचनासाठी पुढे पाणी मिळेल की नाही, अशी भिती शेतकºयांना वाटू लागली आहे. या प्रकल्पांच्या भरवशावरच शेकडो शेतकºयांनी हरभरा, गहू पिकाची पेरणी केली आहे. आता प्रकल्पात होणारी घट पाहता यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.