वाशिम बसस्थानकावर प्रवाशांसाठी सत्य साई संघटनेच्यावतिने पाणपोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:18 IST2019-04-28T14:17:39+5:302019-04-28T14:18:19+5:30
वाशिम : येथील बसस्थानकावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सत्य साई सेवा संघटनेच्यावतिने प्रवाशांसाठी शित व शुध्द पाण्याची पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईवरुन शेकडो प्रवासी दररोज आपली तहान भागवित असताना दिसून येत आहे.

वाशिम बसस्थानकावर प्रवाशांसाठी सत्य साई संघटनेच्यावतिने पाणपोई
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील बसस्थानकावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सत्य साई सेवा संघटनेच्यावतिने प्रवाशांसाठी शित व शुध्द पाण्याची पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईवरुन शेकडो प्रवासी दररोज आपली तहान भागवित असताना दिसून येत आहे.
गोरगरिबांच्या उत्थानासाठी नेहमीच जिल्हयात सक्रीय असलेल्या सत्यसाई सेवा संघटनेच्यावतिने विविध उपक्रम राबविण्यात येतात. उन्हाळयाच्या दिवसात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होवू नये याकरिता अनेक गर्दीच्या ठिकाणी पाणपोई उभारण्याचे कार्य हाती घेण्यात येते. त्याअनुषंगाने अतिशय वर्दळीचे व आवश्यक असलेल्या बसस्थानक परिसरात सत्य साई सेवा संघटनेच्यावतिने पाणपोई उभारण्यात आली आहे. सदर पाणपोई शुध्द व थंड पाणी मिळत असल्याने प्रवाशांना सोईचे झाले आहे.
बसस्थानक परिसरात पाणपोई नसल्याने अनेक प्रवाशांता हॉटेलचा आधार घ्यावा लागत होता. हॉटेल व्यावसायिक काही तरी खरेदी करा नंतर पाणी देणार असा पवित्रा घेत असल्याने प्रवाशांना भूर्दंड सहन करावा लागत होता. परंतु आता बसस्थानक परिसरात सत्यसाई सेवा संघटनेच्यावतिने पाणपोई उभारण्यात आल्याने प्रवाशांतून संघटनेचे कौतूक केल्या जात आहे. सदर पाणपोई उभारण्यासाठी सत्यसाई सेवा संघटनेच्या शहरातील पदाधिकारी, सदस्यांचे मोलाचे कार्य आहे.