शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे संकट टळले; रब्बीतील सिंचनाचा प्रश्न कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:50 IST

जोरदार पावसामुळे सर्वच धरणांची पाणीपातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच धरणांची पाणीपातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न पूर्णत: निवळला; मात्र वार्षिक पर्जन्यमानात ३० टक्के तूट अद्याप कायम असल्याने आगामी रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न कायमच असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून १३१ लघू प्रकल्प आहेत. त्यापैकी पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेले वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर हे अकराही बॅरेज सद्या तुडूंब भरले असून त्याचे दरवाजे अधूनमधून उघडण्यात येत आहेत. याशिवाय वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाची पातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. सोनल आणि अडाण या मध्यम प्रकल्पांमध्येही पिण्यासाठी आगामी एक वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे. १३१ लघूप्रकल्पांपैकी काही प्रकल्प तुडूंब झाली असून बहुतांश प्रकल्पांची पाणीपातळी ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील विहिरी, कुपनलिका, तलाव या अन्य स्वरूपातील जलस्त्रोतांच्या पातळीतही बºयापैकी वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निवळली आहे.असे असले तरी ७९८.७० मिलीमिटर या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत १४ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात ५६९.५९ मिलीमिटरच पाऊस कोसळला असून ३० टक्के तूट भरून निघण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. त्याचा परिणाम प्रामुख्याने आगामी रब्बी हंगामातील सिंचनावर होणार आहे.

सर्वात कमी पाऊस वाशिममध्येजिल्ह्यातील एकाही तालुक्याने यंदा आतापर्यंत पर्जन्यमानात वार्षिक सरासरी गाठलेली नाही. त्यातही वाशिम तालुक्यात सर्वात कमी पाऊस (६३.९८ टक्के) असून सर्वाधिक पावसाची नोंद मालेगाव तालुक्यात (८०.८ टक्के) झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पर्जन्यमान ७१.३१ टक्के आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या पावसामुळे सर्व धरणांची पातळी सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी निकाली निघाला आहे; मात्र एवढ्या पाण्यावर आगामी रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार नाही.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसDamधरण