शिवारफेरीतून साखरडोह परिसरातील १० गावातील नागरिकांना जलसंधारणाचा संदेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:48 IST2018-10-02T15:47:53+5:302018-10-02T15:48:19+5:30

शिवारफेरीतून साखरडोह परिसरातील १० गावातील नागरिकांना जलसंधारणाचा संदेश !
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरडोह (वाशिम) : राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत साखरडोह परिसरातील १० गावांत शिवारफेरी काढून जलसंधारणाचा संदेश देण्यात आला.
सिंगडोह सिंगणापुर येथे ग्रामस्थांच्यासोबत जलसंधारणाच्या कामाबाबत शिवारफेरी काढण्यात आली. पाणलोट क्षेत्रामध्ये कोणती कामे घ्यावी व कोठे घ्यावी याविषयीची माहिती देत जागेची पाहणी करण्यात आली. यामध्ये शेततळे, नाला रुंदीकरण व खोलीकरण, फळबाग, डाळीचे बांध या कामासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच अभिजीत मनवर, उपसरपंच चरण चव्हाण, माजी सरपंच रमेश राठोड, माजी सरपंच गणेश राठोड, ग्रामसेवक आर.आर.शिंदे, सिंगडोहचे पोलिस पाटील संदीप फांदळे, सिंगणापुरचे पोलिस पाटील सुखदेव चव्हाण तसेच गावचे नागरिक सुरेश राठोड, फुलसिंग चव्हाण, राजु चव्हाण, नितेश मनवर, सतिष मनवर, लष्कर पवार, विशाल भारसाकळे, नामदेव राठोड यांच्यासह गावकºयांची उपस्थिती होती. याप्रमाणेच अन्य आठ गावांतही शिवारफेरी काढून जलसंधारणाच्या कामांसाठी जागेची निवड करण्यात आली.