शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारण विभागाला हवे अतिरिक्त ३१५ कोटी; मंजूर केवळ ३५ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST

संतोष वानखडे वाशिम : साठवण तलावांचे पाझर तलावात रुपांतर, सिंचनासाठी पाईप व्यवस्था, लघु प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती, साठवण बंधाऱ्यांची निर्मिती ...

संतोष वानखडे

वाशिम : साठवण तलावांचे पाझर तलावात रुपांतर, सिंचनासाठी पाईप व्यवस्था, लघु प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती, साठवण बंधाऱ्यांची निर्मिती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने २०२० - २१मध्ये जिल्हा नियोजन विभागाकडे अतिरिक्त ३१५ कोटींच्या निधीची मागणी नोंदविली होती. यापैकी केवळ ३५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याने देखभाल दुरूस्तीची कामे कशी करावी? असा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

ग्रामीण भागात सिंचनाची सुविधा निर्माण करणे, जलपातळीत वाढ करणे आदींसाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे लघु प्रकल्प, पाझर तलाव, साठवण तलाव, कालवे दुरूस्तीची कामे केली जातात. लघु प्रकल्प, साठवण व पाझर तलाव, कालवे आदींची आयुर्मर्यादा साधारणत: ४० ते ४५ वर्षे असते. बहुतांश प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपत येत असल्याने देखभाल दुरूस्ती होणे गरजेचे ठरत आहे. मात्र, पुरेसा निधी नसल्याने देखभाल दुरूस्ती कशी करावी? हा पेच आहे. नवीन साठवण तलाव, जुन्या साठवण तलावाचे पाझर तलावात रुपांतर, प्रवाही सिंचन योजनेंतर्गतचे अनेक कालवे नादुरूस्त असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पाईपलाईन टाकणे, आयुर्मर्यादा संपत आलेल्या प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती आदींसाठी जलसंधारण विभागाला जवळपास ३१५ कोटींच्या अतिरिक्त निधीची गरज आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून हा निधी मिळावा, याकरिता जलसंधारण विभागाने गतवर्षी जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. यापैकी केवळ ३५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. निधी मात्र अद्याप मिळाला नाही. निधीअभावी प्रकल्पांच्या देखभाल, दुरूस्तीची कामे प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

०००

असा होता प्रस्ताव

कामे अपेक्षित निधी

साठवण बंधारे १५० कोटी

पाईप व्यवस्था ९० कोटी

साठवण तलावाचे पाझर

तलावात रुपांतर ३० कोटी

योजनांची देखभाल

दुरूस्ती ४५ कोटी

०००००००००

पाणी गळती रोखण्यासाठी दुरूस्ती आवश्यक

रब्बी हंगामात लघु सिंचन प्रकल्पातून अनेक शेतकरी पिकांसाठी पाणी घेतात. देखभाल, दुरूस्तीअभावी काही प्रकल्पांतून पाणी गळती होते. पाणीगळती रोखण्यासाठी या प्रकल्पांची दुरूस्ती आवश्यक ठरत आहे. यासाठी शासनाकडून निधी केव्हा मिळणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.