शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये १९९ विहिरींचे अधिग्रहण !

By admin | Updated: April 9, 2017 14:14 IST

संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे.

वाशिम - संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईची तिव्रता लक्षात घेता त्या-त्या गावात विहिर अधिग्रहण केले जात आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी दिली.यावर्षी जिल्ह्यातील २६६ गावांत पाणीटंचाई जाणवणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कृती आराखड्यातील उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. सुरूवातीला तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये, जलसाठा असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करून गावकऱ्यांना पाणी पुरविले जाणार आहे. वाशिम तालुक्यातील ३५ गावांत ३५ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. याप्रमाणे मालेगाव तालुक्यात ४० गावांमध्ये ४० विहिर अधिग्रहण, रिसोड तालुक्यात ४० गावांत ४० विहिर अधिग्रहण, मंगरूळपीर तालुक्यात २२ गावांत २२ विहिर अधिग्रहण, मानोरा तालुक्यात २५ गावांत २५ आणि कारंजा तालुक्यात ३७ गावांत ३७ अशा एकूण १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांत विहिर अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू झाली.