शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला  वाशिमचा आरोपी पुण्यात जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 18:38 IST

वाशिम : मित्राच्या सहाय्याने पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी जेरबंद करण्यास वाशिम शहर डी.बी. पथकास अखेर तीन महिन्यानंतर यश मिळाले. गणेश बांगर असे नाव असलेल्या या आरोपीस १८ फेब्रुवारीला पुणे येथील चाकण परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी २० फेब्रुवारीला दिली.

ठळक मुद्देपोलिसांची नजर चुकवून आरोपी गणेश बांगर याने दिलीप हरकळची मोटारसायकल घेवून पळ काढला होता. १८ फेब्रुवारी २०१८ रोजी वाशिम शहर डी.बी. पथकास माहिती मिळाली की गणेश बांगर हा पुणे येथे वास्तव्य करित आहे.त्यावरून विशेष पथकाने पुणे येथे शोध घेतला असता, गणेश हा चाकण परिसरात आढळून आला. तेथून त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे.

वाशिम : मित्राच्या सहाय्याने पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी जेरबंद करण्यास वाशिम शहर डी.बी. पथकास अखेर तीन महिन्यानंतर यश मिळाले. गणेश बांगर असे नाव असलेल्या या आरोपीस १८ फेब्रुवारीला पुणे येथील चाकण परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी २० फेब्रुवारीला दिली.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की एका गुन्ह्यात आरोपी गणेश बांगर यास पोलिसांनी २४ नोव्हेंबर २०१७ रोजी बार्शिटाकळी (जि.अकोला) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांच्या कोर्टात हजर केले होते. तेथून परत वाशिमला आणल्यानंतर गणेशचा मित्र दिलीप दिनकर हरकळ हा जिल्हा कारागृहानजिक आरोपीस भेटण्यासाठी आला. जमानतीबाबत बोलायचे आहे, असे सांगून ते दोघे बोलू लागले. यादरम्यान पोलिसांची नजर चुकवून आरोपी गणेश बांगर याने दिलीप हरकळची मोटारसायकल घेवून पळ काढला. याप्रकरणी वाशिम पोलिसांनी आरोपी बांगरसह त्यास मदत करणाºया गणेश हरकळविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. १८ फेब्रुवारी २०१८ रोजी वाशिम शहर डी.बी. पथकास माहिती मिळाली की गणेश बांगर हा पुणे येथे वास्तव्य करित आहे. त्यावरून विशेष पथकाने पुणे येथे शोध घेतला असता, गणेश हा चाकण परिसरात आढळून आला. तेथून त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कार्यवाही वाशिम शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बी.डी. अवचार, राजेश बायस्कर, रमेश तायडे, प्रशांत अंभोरे, ज्ञानदेव मात्रे, गजानन कराळे, गणेश बर्गे, दीपक घुगे यांनी पार पाडली.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हाPoliceपोलिसPuneपुणे