मदत काल जाहीर झाली, म्हणजे काय दरवाज्यात लगेच येते? गारपीटग्रस्तांशी बोलताना रावते भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:35 PM2018-02-16T22:35:23+5:302018-02-17T10:07:34+5:30

गारपिटग्रस्त शेतकर्‍याची  समजूत काढण्याऐवजी उलट त्यास ‘जास्त बोलायचे नाही’ असे खडे बोल सुनावले.

 Washim: Transport Minister Strikes on Garpit Growers; Angry in the farmers | मदत काल जाहीर झाली, म्हणजे काय दरवाज्यात लगेच येते? गारपीटग्रस्तांशी बोलताना रावते भडकले

मदत काल जाहीर झाली, म्हणजे काय दरवाज्यात लगेच येते? गारपीटग्रस्तांशी बोलताना रावते भडकले

Next


नेतन्सा (वाशिम): राज्याचे परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते हे शुक्रवारी गारपिटग्रस्त  भागाची पाहणी करण्यासाठी वाशिम जिल्हा दौर्‍यावर आले होते. दरम्यान, रिसोड  तालुक्यातील नेतन्सा परिसरातील एका गारपिटग्रस्त शेतकर्‍याने त्यांच्याकडे आपल्या  व्यथा मांडल्या. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर रावते यांनी गारपिटग्रस्त शेतकर्‍याची  समजूत काढण्याऐवजी उलट त्यास ‘जास्त बोलायचे नाही’ असे खडे बोल सुनावले.  एक आशेचा किरण म्हणून दारापर्यंत आलेल्या परिवहनमंत्र्यांकडे व्यथा  मांडण्यासाठी त्याठिकाणी जमलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या आशा पूर्णत:  मावळल्या.

रिसोड तालुक्यातील नेतन्सा परिसरात गारपिटग्रस्त एका शेतकर्‍याने ना. रावते  यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताच, रावते यांनी त्या शेतकर्‍यांची समजूत  काढण्याऐवजी ‘मदत काल जाहीर झाली, म्हणजे काय दरवाज्यात लगेच येते. जास्त बोलायचे नाही. करतात ना. तेव्हा तुम्ही असेच वागता. काही भान ठेवा जरा, मी  आलो ना तुमच्यासाठी.’ असे म्हटल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराज पसरली. यावेळी शेतकरी अधिक काही बोलण्याआधी रावते यांनी शेतकर्‍याला ‘जास्त बोलायचे नाही‘  असे म्हटल्याने शेतकर्‍यांत नाराजी ओढवली. या घटनेचा व्हिडीओ सुध्दा व्हायरल  झाला आहे, तसेच या सर्कलमधील पं.स. सदस्य मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले  असता वाशिम येथील पदाधिकार्‍याने त्यांचा माईक हिसकावून घेतल्याने सर्कलमधील  शिवसैनिकांत नाराजी ओढवली होती.

Web Title:  Washim: Transport Minister Strikes on Garpit Growers; Angry in the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.